ग्रामपंचायत लोहारा, पंचायत समिती गोंदिया

ग्रामपंचायतीची माहिती.

विदर्भ हा महाराष्ट्र  राज्याचा ईशान्य दिशेला असणारा प्रदेश आहे. विदर्भाचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३१.६ टक्के आहे, तर लोकसंख्या २१.३ टक्के. उर्वरीत महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाची आर्थिक उन्नती कमी आहे.महाराष्ट्राची पूर्व सीमा कथन करताना आपल्याला प्रथम आठवतो  विदर्भातील गोंदिया जिल्हा. गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा तसेच भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. भारतात प्रसिद्ध असलेल्या गारियाबंद जंगल आणि नागझिरा अभयारण्याच्या सीमेलगत असलेले लोहारा या गावालाही निसर्गाची देन म्हणून वन व पहाडी क्षेत्र व लाभले आहे. लोकाना आकर्षित करेल असे एक खडक पहाडी असून त्यात प्रभू श्रीराम यांचे व भगवान शंकर पार्वती यांचे मंदिर  असून दूर-देरचे भक्तगण दर्शनासाठी येथे येत असतात. लोहारा  हे गाव गोंदिया तालुक्यापासून उत्तर- पश्चिम दिशेला १० कि.मी. अंतरावर आहे.संत तुकडोजी महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या “आदर्श गाव” संकल्पनेला मूर्त स्वरूप देणारे लोहारा गावात या संकल्पनेचे मूर्त स्वरूप पाहायला मिळते. गावातील वारकरी संप्रदायाचे सर्वजण एकत्र येऊन गावात (एक्का) कीर्तनाचे कार्यक्रम करतात. सांस्कृतिक कलांची जोपासना करण्याची परंपरा येथे कायम आहे.आमच्या लोहारा गावात कोणत्याही प्रकारची जातीय भेदभाव नाही हे आम्ही अभिमानाने सांगतो. इथे दलित आणि गैर-दलित यांची घरे शेजारी असून सर्वजण परस्पर सहकार्याने व सद्भावनेने जीवन व्यतीत करतात.गावात दिवाळीच्या नंतर कार्तिक पौर्णिमेच्या पंचमीला भरणारी मंडई ही ग्रामीण परंपरा आणि कलात्मक आविष्काराचे केंद्र आहे. तसेच होळी, राम नवमी, आंबेडकर जयंती, महात्मा गांधी जयंती, कावड यात्रा, एक गाव – एक गणपती,  दुर्गा उत्सव,  इत्यादी उत्सव सहकार्याने व सहकार्यात आनंदाने पार पडतात. गावातील लोकांना सार्वजनिक जीवनात कसे वावरता येईल याची शिकवण देणारी गावची जि.प. शाळा, या शाळेत सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन गावातील सर्व मुले-मुली नियमितपणे शाळेत जातात. लोकसहभागातून रुपये जमा करून शाळेच्या भिंतीला आकर्षक अशी पेंटिंग केलेली असून शाळा डिजिटल करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक मुलगा आधुनिक तंत्रज्ञानाची जवळीक साधत असून बौद्धिक व कौशल्य विकास साधत आहे.ग्रामपंचायत स्तरावर बचत गटांना प्रशिक्षण, श्रमदान, बंधारे बांधणे, गांडूळ खत निर्मिती, शेतकऱ्यांना शासकीय व वयैक्तिक योजनांचा लाभ मिळवून देणे, स्वच्छता आणि शौचालयांचे महत्त्व पटवून देणे अशा विविध योजना राबवल्या जातात.

संत तुकडोजी महाराजांच्या वचनानुसार:

जे का रंजले गांजले | त्यासी म्हणावे आपुले

जें जें ज्यासी असेल ठावे | ते ते समाजा शिकवीत जावे

जीवजनास फायदे द्यावे । मानवधर्म म्हणोनि

.

लोकसंख्या माहिती

श्रेणीपुरुषस्त्रियाएकूण
एकूण लोकसंख्या8918531744
अनुसूचित जाती5749106
अनुसूचित जमाती226231457
इतर लोकसंख्या6085731181

ग्राम पंचायत सदस्य संख्या

श्रेणीसंख्या
एकूण सदस्य 9 +  1 सरपंच थेट जनतेतून10
महिला सदस्य02
अनुसूचित जाती पुरुष सदस्य01
अनुसूचित जमाती पुरुष सदस्यअनुसूचित जमाती महिला सदस्य0101
सर्वसाधारण महिला सदस्य02
सर्वसाधारण पुरुष सदस्य02  

कुटुंबांची स्थिती दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे

श्रेणीसंख्या
एकूण कुटुंबे605
दारिद्र्य रेखेखालील कुटुंबे235
दारिद्र्य रेखेवरील कुटुंबे370
प्रकारसंख्या
अनुसूचित जाती (अजा)11
अनुसूचित जमाती (अज)72
इतर152
एकूण235

घरांची संख्या

प्रकारसंख्या
राहण्यायोग्य घर576
गोठे47
इतर
एकूण घरांची संख्या623

() ग्रामपंचायत कार्यकारणी मंडळ.

.श्री. जितेंद्र पुरुषोत्त्तम ढेकवार   —        सरपंच

.श्री.दिलीपकुमार जैपाल ऊके    —        उपसरपंच

.श्री अश्विन भक्तराज बोरकर    —       सदस्य

.श्री देवेंद्र सेवकराम मोहमारे             सदस्य

.श्री भूमेश हौसलाल पटले       —        सदस्य

.सौ. अनिता धनराज बनकर     —        सदस्या

.सौ. सुकवंताबाई शिशुपाल बिसेन  —     सदस्या

.सौ. ज्योती रामप्रसाद सिंदखोपडे  —      सदस्या

.सौ. कल्पना नंदकिशोर नागरीकर  —     सदस्या

१०.सौ. ललिताबाई चंदन परतेती     —     सदस्या

() संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता समिती.

.श्री जितेंद्र पुरुषोत्त्तम ढेकवार           अधक्ष्य 

.श्री.दिलीपकुमार जैपाल उके           सदस्य

.श्री.तेजराम हगरू नागपुरे   —           सदस्य

.श्री.देवेंद्र सेवकराम मोहमारे          सदस्य

.श्री.पुनाप्रसाद खेमचंद लिल्हारे        सदस्य

.श्री.भाऊलाल धनलाल परतेती  —       सदस्य

.श्री.नुतनप्रसाद नत्थुप्रसाद पांडे —      सदस्य

.सौ.नितलेश्वरी नरेश पटले   —         सदस्य

.श्री.कवेश्वर जाणू धुर्वे                 सदस्य

१०.अंकुश धर्मराज परतेती    —           सदस्य

११.श्री.पंकज मदनलाल मस्करे —         सदस्या

१२.कु.ज्योती झामलाल पटले —          सदस्या

१३.सौ.कल्पना नंदकिशोर नागरिकर —     सदस्या

() शाळा व्यवस्थापन समिती

श्री. भाऊलाल धनलाल परतेती –       अध्यक्ष

श्रीमती सरिता डिगंबर नागपुरे –       उपाध्यक्ष

श्री. आय.के. मेश्राम (मुख्याध्यापक) –  सचिव

श्री. अश्विन भक्तराज बोरकर  –       सदस्य

श्री. देवेंद्र शिवदयाल तुरकर –          सदस्य

श्री. राजेश सुकराम बिसेन  –          सदस्य

श्रीमती. जि.एस. बोपचे (शिक्षिका) –  सदस्य

श्रीमती. कल्पना हेमराज नाईक  –     सदस्य

श्रीमती. ज्ञानेश्वरी राजेश बागळे –      सदस्य

श्रीमती. रंजना डिगंबर हटेले –         सदस्य

श्रीमती.कविता पांडुरंग नागपुरे –       सदस्य

श्रीमती. योगिता भैयालाल बिसेन (अंगणवाडी सेविका)–   सदस्य

कु. राजेश्री राजेश बिसेन (विध्यार्थि प्रतिनिधी)–           सदस्य

कुमार. प्रज्वल बाबूलाल मस्के (विध्यार्थि प्रतिनिधी) –     सदस्य

बाल संरक्षण समिती

.क्रं.समिती सदस्यांचे नाव पद निवड 
.श्री.जितेद्र पुरुषोत्तम ढेकवार अधक्ष्य सरपंच 
.कु. ज्योती झामलाल पटले सदस्य पोलीस पाटील
.सौ.भागवंती नागपुरे  सदस्य आशा सेविका
.सौ. बघेले मैडम सदस्य शिक्षक 
.श्री. भाऊलाल धनलाल परतेती सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अधक्ष्य
.श्री.गेंदलाल गोविंदा कटंगकार सदस्य स्थानिक सामाजिक प्रतिनिधी
.श्री.गोविंद शिवदयाल तुरकर  सदस्य स्थानिक सामाजिक प्रतिनिधी
.श्री.दिनेश नुतनप्रसाद पांडे  सदस्य स्थानिक सामाजिक प्रतिनिधी
.कुमार. कौशिक सुकदेव बिसेन सदस्य मुलगा प्रतिनिधी १२ ते १८ वयोगट
१०.कुमारी. निकिता फणींद्र मसे सदस्य मुलगी प्रतिनिधी १२ ते १८ वयोगट
११.सौ. योगिता भैयालाल बिसेन सदस्य सचिवआंगणवाडी सेविका

ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा स्वच्छता समिती

.क्रं.नाव पद
.श्री.जितेद्र पुरुषोत्तम ढेकवार अधक्ष्य
.सौ.भागवंती ऋषिसर नागपुरे  सचिव
.सौ.दुर्गा बाबूलाल पटले सदस्य 
.सौ.योगिता भैय्यालाल बिसेन सदस्य 
.सौ.सुकवंता शिशुपाल बिसेन सदस्य 
.श्री. योगेश हिरापुरे सदस्य 
.कु, यस यु. करमरकर सदस्य 
.सौ.लता प्रदीप नागरिकर सदस्य 
.सौ.माहेश्वरी लोकचंद मोहमारे  सदस्य 
१०.श्री.नितेश भोजराज कटंगकार सदस्य 
११.श्री.एस.. बांगरसदस्य 

सेवा आणि योजना निधी जमा खर्च वर्ष 2024-2025  ग्राम पंचायत लोहारा 

अ.क्र.योजनेचे नाववर्षएकूण प्राप्त अनुदानएकूण खर्च अनुदानशिल्लक अनुदान
1महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना2024-2025129475116100393219
215 वा वित्त आयोग योजना2024-202510552371337193651337
3स्वच्छ भारत मिशन2024-202500000000235577
4नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे2024-2025000000008192

योजना

1) केंद्र पुरस्कृत योजना


2) राज्य पुरस्कृत योजना

सेवा